krushi yantrikikaran update | कृषी यांत्रिकीकरण पहा तुमचा नंबर लागला का ?

मित्रांनो महाडीबीडी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यंत्रीकरण बाबीची एक ऑगस्ट 2025 रोजी सोडत लागलेली आहे आणि याच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज द्वारे कळवण्यात आलेले आहे या सोडतीमध्ये आपला नंबर लागलेला आहे का आपल्याला एसएमएस आला नसेल तर आपण काय करावं कोणती कागदपत्र याच्या अंतर्गत अपलोड करावी लागतात याबाबतची थोडक्यात अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या च्या सर्व योजना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. ज्याच्यामध्ये प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरती आता निवड केली जात आहे.

krushi yantrikikaran update संपूर्ण माहिती

आणि याच्याच अंतर्गत प्राधान्याने निवड झालेल्या शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे कळवण्यात आलेले आहे. मित्रांनो आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एसएमएस जात नाहीत त्यांचे मोबाईल नंबर चुकीचे असतात किंवा मोबाईल नंबर बंद झालेले आहेत असे शेतकरी आपली या यादीमध्ये नाव आहे का ते ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित करण्यात आलेले आहे यादीमध्ये पाहू शकतात आपल्या आधार नंबर नुसार किंवा आपल्या अर्जाच्या नंबर नुसार सुद्धा आपली स्थिती त्यांना या ठिकाणी पाहता येते आणि जर याच्यामध्ये नंबर लागलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना 10 ऑगस्ट 2025 पर्यंत आपली कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आलेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आलेले नाहीत परंतु विनर दाखवत आहे.

krushi yantrikikaran update सविस्तर माहिती

अशा शेतकऱ्यांना 10 दिवसांमध्ये आपले कागदपत्र अपलोड करावे लागतात कृषी यंत्रीकरण या बाबीचे कागदपत्र अपलोड करत असताना शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी याचबरोबर शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक आधार कार्ड याचबरोबर जे अवजार आपण खरेदी करणार आहात त्या अवजाराच कोटेशन त्या अवजाराचा टेस्ट रिपोर्ट अशा प्रकारची कागदपत्र या ठिकाणी प्राथमिक स्तरावरती द्यावी लागतात. आता याच्यामध्ये ही कागदपत्र तर द्यावी लागणार पण कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपण पात्र आहात का हे सर्वात महत्त्वाच आहे. जर एसएमएस आलेला असेल तर लॉगिन करून आपण आपली कागदपत्र अपलोड करू शकता. जर एसएमएस आलेला नसेल आपल्याला जर माहित नसेल आणि चेक करायचं असेल.

तर महाडीबीडी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती येऊ शकता. मुख्य प्रश्नावरती आपल्याला याठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत ज्याच्यामध्ये अर्जाची सद्यस्थिती आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती प्रकाशित करण्यात आलेली निवड यादी आहे या निवड यादीवरती क्लिक करून जिल्हा तालुका आणि गावानुसार आपल्या या योजनेची यादी पाहू शकता आणि जर आपल्याकडे अर्ज नंबर असेल तर याच्यामध्ये अर्ज नंबर एंटर करून सुद्धा आपण आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता आपल्याला याच्यामध्ये अर्ज नंबर टाकायचा याच्यामध्ये कॅप्चा कोड दिलेला तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सर्च वरती क्लिक करायचय याच्यानंतर आपल्या अर्जा ची जी काही स्थिती आहे ती दाखवली जाईल याच्यामध्ये जर विनर दाखवत असेल.

तर आपल्याला लॉगिन करून आपला फार्मर आयडी आणि ओटीपी टाकून लॉगिन करून आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत जर समजा याच्यामध्ये अर्ज नंबर आपल्याकडे नसेल तर आपण आपला लाभार्थ्याचा आधार नंबर टाकून सुद्धा आपल्या सर्व अर्जाची स्थिती पाहू शकता आधार नंबर टाकायचा ओटीपी मागवायचा आहे ओटीपी एंटर करून सर्च केल्याबरोबर आपले जेवढे काही अर्ज आहे ते दाखवले जातील याच्यामध्ये जर एखादा अर्ज निवड झालेला असेल तर त्याच्यापुढे आपल्याला विनर असं दाखवल जाणार आहे तर मित्रांनो अशाप्रकारे आपण आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता आणि जर आपल्याला या निवड यादीमध्ये पात्र केलेल असेल तर दिलेल्या विहित मुदतीमध्ये हे कागदपत्र अपलोड करू शकता. मित्रांनो याच्यासाठी सर्वात महत्त्वाच आहे ते म्हणजे टेस्ट रिपोर्ट. टेस्ट रिपोर्ट आपण ज्या ठिकाणी अवजार खरेदी करणार आहोत त्या ठिकाणी आपण मागू शकता किंवा शासनाच्या खूप साऱ्या वेबसाईट आहेत.

Leave a Comment

Join Now